परराज्यातील कामगारांना आपआपल्या राज्यात परत जाण्यासाठी संकेत स्थळावर नोंदणी करावी


लातूर, (जिमाका)- देशाच्या विविध राज्यातून महाराष्ट्रात रोजगारासाठी आलेल्या परराज्यातील कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने https://migrant.mahabocw.in/migrant/form  हे संकेत स्थळ तयार केले असून ज्या परराज्यातील कामगारांना आपापल्या राज्यात परत जाण्याची इच्छा असेल त्यांनी या संकेत स्थळावर नोंदणी करावी. या संदर्भात मार्गदर्शन मिळण्यासाठी महाराष्ट्राचे कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दि. 16 जून 2020 रोजी आदेश पारित केले असून त्यानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयातील कामगार अधिकाऱ्यांची या कामासाठी नियुक्ती केली आहे.
 तरी लातूर जिल्हयातील परराज्यातील कामगारांनी त्यांच्या अडचणी संदर्भात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, सदभावना नगर, विजया गॅस एजन्सी जवळ, औसा रोड, लातूर दुरध्वनी क्र. 02382-200174 (Eamil id- acllatur24@gmail.com ) या वर संपर्क करावा असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मोहसिन अ. सय्यद यांनी एका पत्रकाव्दारे कळविले आहे.