आर्य वैश्य मित्रमंडळ लातूरच्या वतीने महाराष्ट्रातील पहिला ऑनलाईन उपवधु-उपवर परिचय..

 


लातूर/आर्य वैश्य मित्रमंडळ लातूरच्या वतीने   महाराष्ट्रातील पहिला ऑनलाईन उपवधु-उपवर परिचय मेळावा जुळून येती रेशीमगाठी रविवारी दि. 02-08-20 रोजी  आयोजित करण्यात आला होता. 
       जागतिक पातळीवर कोरोना सारख्या महामारी रोगाने ग्रासलेल्या परिस्थितीत राज्यातील आर्य वैश्य समाजातील उपवर-उपवधु यांना आपल्या भविष्याची चिंता होती की आपले विवाह कसे होतील.यावेळी डिजिटल इंडियाचे स्वप्न उराशी बाळगून श्री शशिकांत मोरलावार, त्यांचे सुपुत्र अक्षय मोरलावार,  उमाकांत मद्रेवार, अनिरुद्ध राजूरवार, सुहास बोळसकर व बालाजी पेन्सलवार यांच्या सहकार्याने या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जुळून येति रेशीम गाठी या महाराष्ट्रातील  सर्व प्रथम ऑनलाईन मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
      या मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र,इतर राज्य व बाहेर देशातील 900 पेक्षा जास्त उपवर-उपवधु यांनी उत्स्फूर्तपणे ऑनलाईन  नोंदणी करून या मेळाव्यास भरघोस प्रतिसाद देत  एकप्रकारे चांगली दिशा देण्याचे काम केले.या ऑनलाईन मेळाव्यात प्रथम नोंदणी प्रथम  पध्दतीने 450 उपवर-उपवधु यांनी आपला परिचय ऑनलाईन पद्धतीने  करून दिला.या मेळाव्याचे कोम टीव्ही पुणे यांच्या साह्याने यु ट्यूब च्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते.संपूर्ण जगभरातील पंधरा  हजार पेक्षा जास्त लोकांनी या मेळाव्याचा आनंद घेतला. यामुळे सर्वांची  खुप मोठी आर्थिक व वेळेची बचत झाली आहे.या मेळाव्यास महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी ऑनलाईन पद्धतीने शुभेच्छा दिल्या व अशा कोरोना सारख्या महामारीत सुद्धा संधीचे सोने करण्याचे काम आर्य वैश्य मित्रमंडळ लातूर  यांनी केल्याचे वक्तव्य केले.तसेच सद्य काळातील ही खूप मोठी गरज आहे व  ती लातूर करानी यशस्वी पणे पुढाकार घेऊन परिचय मेळाव्याद्वारे संपन्न करत आहेत व इतरांना नवीन मार्ग दाखवण्याचे कार्य केले असे गौरवोदगार काढले. 
       या मेळाव्याचे डिजिटल  टेक्नॉलॉजीचे काम अक्षय मोरलावार,आनंद मोरलावार, गिरीश पेन्सलवार,ज्ञानेश्वर पेन्सलवार व ऋषिकेश राजूरवार यांनी संपूर्ण दिवसभर  कोणताही अडथळा न येऊ देता खूप मेहनत घेऊन यशस्वी केले.
    या ऑनलाईन मेळाव्यात सुंदर रीत्या ऑनलाईन परिचय देणाऱ्या 3 उपवर व 3 उपवधू यांना  बेस्ट परफॉर्मर अवॉर्ड पण देण्यात आले त्यासाठी श्री श्रीनिवास मोरलावार, श्री सुरेशराव  पेन्सलवार, श्री राजेंद्र कुंचमवार,श्री विजयकुमार मुक्कावार,  श्री सुधाकर कोटगिरे व श्री विलास बचेवार, यांनी परीक्षक म्हणून कार्य पाहिले. 
     यासाठी अध्यक्ष श्री प्रल्हाद देगावकर, उपाध्यक्ष श्री बालाजी पेन्सलवार,सचिव श्री चंद्रकांत चंडेगावे ,श्री सुरेश पेन्सलवार, योगेश गुंडावार  यांनी  मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन  केले.