नांदेड /महाराष्ट्र राज्यातील पत्रकार व सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव कोळेकर यांना राज्यपाला मार्फत नियुक्त करण्यात येणाऱ्या विधान परिषदेवर नियुक्त करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार संघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र येरावार यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, यांना निवेदन पाठवून केली आहे.
राज्यपाल मार्फत नियुक्त करण्यात येणाऱ्या बारा आमदार सदस्याची नियुक्ती करताना पत्रकार प्रतिनिधीची नियुक्ती करण्याची अत्यंत गरज आहे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारांना ओळखल्या जाते परंतु पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्यात एकही पत्रकार आमदार नसल्याने पत्रकारांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. पदवीधर मतदार संघाचा आमदार आहे, शिक्षकाचा आमदार आहे परंतु पत्रकारांचा आमदार का नसावा हा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. नोंदणीकृत महाराष्ट्र पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी ग्रामीण भागातील पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून शासनदरबारी पाठपुरावा करीत आहेत.
अडचणीत सापडलेल्या पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठीही कोळेकर यांचे कार्य कौतुकास्पद आहे. राज्यातील अनेक पत्रकारांवर हल्ले झाले आहेत परंतु कोणत्याही सरकार मधील कोणत्याही आमदाराने पत्रकारांची बाजू मांडली नाही ही शोकांतिका आहे पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी पत्रकारांचा हक्काचा आमदार असणे आवश्यक आहे त्यामुळेच राज्यपालामार्फत नियुक्त करण्यात येणाऱ्या बारा आमदारा पैकी पत्रकार प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव कोळेकर यांची विधान परिषदेवर नियुक्ती करावी अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष नरेंद्र येरावार लातूर जिल्हा अध्यक्ष विठ्ठल तगलपल्लेवार परभणी जिल्हा अध्यक्ष प्रदीप कोकडवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोषारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे निवेदन देण्यात येणार आहे तसेच महाराष्ट्र पत्रकार संघाचे एक शिष्टमंडळ लवकरच राज्यपाल व मुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचेही येरावार यांनी सांगितले आहे
महाराष्ट्र पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव कोळेकर यांना विधान परिषदेवर घेण्याची मागणी