जिंतूरला  चिद्रवार उत्तरवार परिवाराचा उत्तम निर्णय

 मुलगी पहायला आले अन लग्न लावून गेले


जिंतूरला  चिद्रवार उत्तरवार परिवाराचा उत्तम निर्णय


जिंतूर/ जिंतूर येथे मुलगी पहायला आले आणि लग्न लावून गेले असा योग घडून आला  जिंतूर शहरातील व्यापारी श्री राजकुमार जगन्नाथ चिद्रवार यांची मुलगी चि सौ कां दिक्षा हिला बोधडी जि नांदेड येथील व्यापारी श्री श्रीराम लक्ष्मराव उत्तरवार आपल्या मुलासह मुलगी पाहायला आले होते आणि दोघांनी पसंती दिल्या नंतर चक्क  त्यांनी लग्न लावण्याचा निर्णय घेतला दोन्ही परिवाराचा निर्णय झाल्याने श्रीराम उत्तरवार यांचे चिरंजीव सतीश उत्तरवार यांच्या बरोबर दिक्षा चा विवाह लावून देण्यात आला कोरोना परिस्थीती मुळे सर्व च गावात पालक आपल्या आपल्या मुलांचे लग्न कसे होईल या प्रयत्नात आहेत व्यापारी मुलं तर सर्वत्र मुली मिळत नसल्याने खूप त्रासून गेल्या च्या अनेक ठिकाणच्या घटना आपण पहात आहोत  कोरोना संसर्ग मुळे या सारख्या निर्णयाने आर्य वैश्य कोमटी समाजात पण  चमत्कार झाला आहे असे मत महासभेचे राज्य समन्वयक प्रदिप कोकडवार यांनी व्यक्त केले असून समाजाचे अध्यक्ष सखाराम चिद्रवार यांनी दोन्ही पाहुण्यांचे सअभिनंदन केले आहे जिंतूर येथील छत्रपती शिवाजी चौक सचिन डिपार्टमेंट जवळ दि ३जून सायंकाळी६वा विवाह संपन्न झाला