गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 
सन 2019-20 खातेदार शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला लागू 


     लातूर (जिमाका)दि.5:- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सन 2015- 16 पासून राबविण्यात येत आहे. सन 2019-20 मध्ये योजनेची व्याप्ती वाढवून योजनेमध्ये राज्यातील सर्व वाहितीधारक  खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वाहितीधारक खातेदार म्हणून नोंद असलेले कोणताही एक सदस्य आई-वडील शेतकऱ्यांची पती/ पत्नी मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणताही एक व्यक्ती असे 10 ते 75 वयोगटातील एकूण दोन जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. 
      अपघातग्रस्त कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता राज्यातील सुमारे 1.5 कोटी वहिती खातेदार शेतकरी वहिती खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला देखील या विमा योजनेअंतर्गत समावेश करून एकूण 3.4 कोटी जणांना या  योजनेअंतर्गत प्रचलित योजना अधिक व्यापक व समावेशक करण्यात आलेली आहे. खातेदार शेतकऱ्यांकरिता शासन स्वतः विमा भरते अपघाती मृत्यू अथवा दोन अवयव निकामी झाल्यास रू.2 लाख व एक अवयवय निकामी झाल्यास रू.1 लाख नुकसान भरपारई देण्यात येते. 
      आपल्या कार्यक्षेत्रातील एखाद्या वहितीधारक शेतकऱ्यांच्या अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास त्यांच्या वारसदार या योजनेची माहिती द्यावी. योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या कार्यक्षेत्रातील कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्ह्यातील सर्व सरपंच, गाव कामगार, तलाठी, पोलीस पाटील व सर्व शेतकऱ्यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने यांनी केले  आहे.
       गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा येाजना दि.10 डिसेंबर 2019 ते 9 डिसेंबर 2020 या कालावधीकरीता असून या योजनेचे शासन निर्णय व मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.