लातूर /विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण 16 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 14 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 02 व्यक्तीचे अहवाल Inconclusive आले आहेत अशी माहिती डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील रुग्णालयात दिनांक 09.06.2020 रोजी खाडगांव रोड लातुर येथील रहिवशी कोरोना (कोविड 19) पॉझिटिव्ह अहवाल आल्यामुळे रुग्ण दाखल झाला होता. सदर रुग्ण पुनम नगर ( अंधेरी) मुंबईवरुन प्रवास करुन आला होता. या रुग्णाचे पाच वर्षापूर्वी किडनी प्रत्यारोपण झाले होते व हा रुगण प्रत्यारोपणानंतर डायलिसीस व Immunosuppressants उपचार चालू होते. या रुग्णालयात त्याचे दोन वेळा डायलिसिस करण्यात आले व मागील ०४ दिवसापासुन हा रुगण व्हेंटीलेटर वर होता . या रुग्णाचा उपचारादरम्यान दिनांक 15.06.2020 रोजी सायंकाळी ठीक 4.40 वा. मृत्यु झाला अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुखडॉ. मारुती कराळे यांनी दिली.
आज दिनांक 15 जून 2020 रोजी 7 पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी 6 उदगीर येथील( हनुमान नगर) पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत तर लातूर येथील कापड गल्लीतील 1 रुग्ण हा बाभळगाव येथील पूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहे