जिल्हयातील 7 शासकीय व 12 खाजगी रूग्णालयाचा महात्मा फुले जन  आरोग्य योजनेत समावेश

*जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा 
     लाभ घेण्याचे आवाहन*
लातूर,(जिमाका) :-महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना संयुक्तिक रित्या 1 एप्रिल 2020  पासून सुरू केलेली आहे. ही योजना गरीब व व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकावर उपचाराचा आर्थिक ताण पडू नये व त्यांना योग्य प्रतीचा उपचार मिळावा या उद्देशाने ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे. ज्यांच्याकडे पिवळे, केसरी, अंत्योदय किंवा अन्नपूर्णा शिधापत्रिका आहे अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळतो तसेच आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमध्ये पांढरी शिधापत्रिका धारक (औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे  व नागपूर विभागातील वर्धा जिल्हा) याव्यतिरिक्त आश्रम शाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय अनाथ् आश्रमातील मुले, शासकीय वृद्धश्रमातील  ज्येष्ठ नागरिक माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकारांचा व महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी कार्यान्वित असलेले बांधकाम कामगार या घरांचा समावेश राहील. 
      प्रधानमंत्री जन आरोग्य योजने मध्ये सामाजिक आर्थिक व जात निहाय जनगणना 2011 मधील नोंदीत कुटुंब ही लाभार्थी असून ग्रामीण भागासाठी स्वाभाविक व शहरी भागासाठी व्यावसायिक निकष ठेवण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत 1.5 लाख रुपयांचा वार्षिक लाभ व 2.5 लाख रुपये मूत्रपिंड प्रत्यारोपनासाठीचा  लाभ लाभार्थ्यांना मिळेल. तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने मध्ये 1 हजार 299 उपचारांचा समावेश आहे. दोन्ही योजनेच्या एकत्री करण्याच्या माध्यमातून राज्यातील 2. 23 कोटी कुटुंबांना म्हणजेच राज्यातील 85 टक्के जनतेला या योजनेचा लाभ मिळत होता. 
    सध्याच्या covid-19 च्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात शासनाने 23 मे 2020 रोजी एक महत्त्वकांक्षी  निर्णय घेतलेला आहे. त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व जनतेला म्हणजेच जे या योजनेमध्ये समाविष्ट नव्हते व महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेल्या उर्वरित नागरिकांना सुद्धा व लाभार्थी असलेल्या नागरिकांना संलग्नित रुग्णालयांमध्ये या योजनेचा लाभ घेता येईल. 
     या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना रहिवासी पुरावा म्हणून वैध पिवळी, केशरी व शुभ्र शिधापत्रिका तहसीलदार यांचा दाखला व अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक पुरावे जन्य कागदपत्र व शासनमान्य फोटो ओळखपत्र देणे आवश्यक राहील. 23 मे 2020 रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे जे या योजनेमध्ये लाभार्थी नाहीत व महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. त्यांना या योजनेचा लाभ 31 जुलै 2020 पर्यंत घेता येईल. या योजनेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 996 व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 1 हजार 209  उपचार पुरविले जात आहेत. सध्या परिस्थितीचा विचार करता जे योजनेमध्ये समाविष्ट नसलेले परंतु महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उर्वरित नागरिकांना सुद्धा अंगीकृत रुग्णालयांमध्ये 996 उपचारपद्धतीचा लाभ मान्यताप्राप्त दराने उपलब्ध करून देण्यात येत आहे. शासकीय रुग्णालयातील राखीव असलेल्या 134 उपचारा पैकी सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व श्रवण यंत्राचा उपचार वगळता 120 उपचार खाजगी संलग्नित रूग्णांलयामार्फत 31 जुलै 2020 पर्यंत मान्यताप्राप्त दराने उपलब्ध करण्यात आलेले आहेत. तसेच काही किरकोळ मोठी उपचार व काही तपासण्या अशा 67 पॅकेज या योजने अंतर्गत समाविष्ट नाहीत. परंतु त्या अंगीकृत रुग्णालयांमध्ये लाभार्थ्यांना सीजीएचएस च्या दरानुसार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड दाखवून देशातील संलग्नित रुग्णालयांमध्ये लाभ घेता येईल. 


या योजनेमध्ये लातूर जिल्ह्यातील 19 रुग्णालयांचा समावेश आहे. त्यामध्ये एकूण खाजगी 12 रूग्णालय 1) आल्फा सुपरस्पेशलीटी रूग्णांलय,लातूर 2) देशपांडे रूग्णालय,लातूर 3) गायत्री सुपरस्पेशॅलीटी रूग्णांलय आणि क्रिटीकल केअर सेंटर,लातूर 4) आयकॉन सुपरस्पेशॅलिटी रूग्णांलय,लातूर 5) इंदुमती रूग्णांलय,उदगीर 6) कृष्णा रूग्णालय,लातूर 7) लातूर कॅन्सर रूग्णांलय,लातूर 8) लाईफ केअर रूग्णांलय ॲन्ड संशोधन केंद्र,उदगीर 9) सदसुख रुग्णांलय,लातूर 10 विवेकानंद रूग्णांलय व संशोधन केंद्र,लातूर 11) येलाले रूग्णांलय,लातूर 12) यशवंतराव चव्हाण ग्रामीण रूग्णांलय,लातूर   व  शासकीय  एकूण 7 रुग्णालय 1) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,लातूर 2) ग्रामीण रूग्णालय ॲन्ड ट्रॉमा युनिट,अहमदपूर 3) ग्रामीण रूग्णालय ॲन्ड ट्रॉमा युनिट, मुरूड ता.लातूर 4) ग्रामीण रूग्णालय,औसा  5) उपजिल्हा रूग्णालय,निलंगा 6) उपजिल्हा रूग्णालय,उदगीर 7) महिला रूग्णांलय,लातूर   समावेश आहे. लाभार्थ्यांना या योजनेची माहिती मिळविण्यासाठी संलग्नित रुग्णालयातील आरोग्य मित्राची मदत घेता येईल तसेच. www.jeevandayee.gov.in या वेबसाईटवर किंवा टोल फ्री क्रमांक MJPJAY 15 53 88 PMJAY -14555 यावर सुद्धा माहिती ती घेता येईल.
      सद्य परिस्थितीचा विचार करता मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य आरोग्य हमी योजना यांच्या निर्देशानुसार शिथीलता देण्यात आलेली आहे. तरी लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे समन्वयक यांनी केले आहे.