विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 10 रुग्णांणा मिळाली सुट्टी

लातुर/  विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील रुग्णालयात एकुण 24 कोरोना (कोविड 19) पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी 10 रुग्णांची प्रकृती पुर्णपणे बरी झाली असल्यामुळे आज त्यांना रुग्णालयांमधुन सुट्टी देण्यात आली आहे.   दिनांक 17 मे रोजी ठाणे येथुन आलेला माळी गल्ली येथील 52 वर्षीय रुग्ण पुर्णपणे बरा झाला या रुग्णाला फुफुसाच्या दोन्ही बाजूस निमोनिया होता, रक्ताचा अप्लास्टीक अनेमिया नावाचा गंभीर आजार व उच्च रक्तदाब होता.  हा रुग्ण १२ दिवस व्हेंटीलेटर सपोर्टवर होता व या रुग्णाला Aplastic Anemia सारखा गंभीर आजार असुन सुध्दा त्याने कोरोना वर मात केली आहे.  हा रुग्ण मागील २१ दिवसांपासुन या संस्थेच्या रुग्णालयात उपचार घेत होता आज तो पुर्णपणे बरा झाल्यामुळे त्याला सुट्टी देण्यात आली. हडको कॉलनी येथील 58 वर्षीय रुग्ण व मु. बामणी पो. भातांगळी येथील 53 वर्षीय हे दोन्ही रुग्ण 04 दिवस व्हेंटीलेटर सपोर्टवर होते. या रुग्णास डायबेटीस व उच्च रक्तदाब असुनही हे रुग्ण पुर्णपणे बरे झाले. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील डॉक्टरांनी या सर्व रुग्णांवर योग्य वेळेत योग्य ते उपचार केल्यामुळे हे रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्यामुळे या रुग्णांना आज रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली. सुट्टी देण्यात आलेल्या इतर 7 रुग्णांमध्ये कोरोना आजारा समवेत दोघांना उच्च रक्तदाब व इतर 5 रुग्णांना साधारण स्वरुपाचा आजार होता हे सर्व रुग्ण ९ ते ५८ वर्षे वयोगटातील असुन यात ०५ स्त्री व ०५ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. या प्रसंगी मा. ना. श्री. विक्रांत गोजमगुंडे महापौर,  मा. ना. श्री. चंद्रकांत बिराजदार उप महापौर, मा. श्री. देविदास टेकाळे  आयुक्त, लातुर महानगरपालिका, डॉ. गिरीष ठाकुर अधिष्ठाता, डॉ. मंगेश सेलुकर उप अधिष्ठाता,  डॉ. संतोषकुमार डोपे वैद्यकीय अधिक्षक, डॉ. निलिमा देशपांडे प्रा. व वि. प्र. औषधवैद्यकशास्त्र,  डॉ. शिवप्रसाद मुंदडा प्रा. व वि. प्र. बालरोग विभाग, डॉ. मारुती कराळे, डॉ. प्रशांत माले, डॉ. रमेश बगडे,  डॉ. किशोर जाधव  श्रीमती अमृता पोहरे अधिसेविका हे उपस्थित होते. उर्वरीत 14 रुग्णांवर या संस्थेच्या विलगीकरण व  अतिदक्षता कक्षामध्ये शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचार सुरु असुन त्यांच्या आवश्यक त्या सर्व तपासण्या करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी 05 रुग्णांची स्थिती अतिगंभीर आहे त्यामध्ये मोती नगर मधील 02 रुग्ण, कादरी नगर औसा, मु. येल्लोरी ता. औसा व भाग्य नगर लातुर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असुन अशा एकुण 05 रुग्णांची स्थिती गंभीर आहे.हे ०५ रुग्ण सध्या व्हेंटीलेटर सपोर्टवर आहेत व त्यांना फुफुसाच्या दोन्ही बाजूस निमोनिया आहे. त्यातील कादरी नगर औसा येथील रुग्णास डायबेटीस असुन उच्च् रक्तदाबाचा व किडनीचा त्रास आहे. आज या रुग्णाचे डायलिसीस करण्यात आले आहे. दोन रुग्णांना उच्च् रक्तदाब, दमा आहे तर एका रुग्णास डायबेटीस व उच्च् रक्तदाब आहे व दुस़-या एका रुग्णांस फक्त उच्च रक्तदाब आहे.  आज दिनांक 08.06.2020 रोजी विलगीकरण कक्षात एकुण 14 रुग्ण दाखल असुन त्यापैकी ०५ रुग्ण व्हेंटीलेटर सपोर्टवर असुन दोन रुग्ण ऑक्सीजन वर आहेत व उर्वरीत 07 रुग्णांची प्रकृती सद्यस्थितीत स्थिर आहे अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्राध्यापक व विभागप्रमुख औषधवैद्यकशास्त्र डॉ. निलिमा देशपांडे व कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख   डॉ. मारुती कराळे यांनी दिली.