लातूर 4, उदगीर 5 व अहमदपूर 2 चे रुग्ण कोरोना बाधित

लातूर जिल्हयातील 110 पैकी 93  निगेटीव्ह, 11 पॉझिटिव्ह, तर 06 अनिर्णित


लातूर 4, उदगीर 5 व अहमदपूर 2 चे रुग्ण कोरोना बाधित


आज उदगीर उपजिल्हा रुग्णालयातून एका रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला


जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 93 कोरोना बाधित रुग्ण, उपचार घेत असलेले रुग्ण 53, डिस्चार्ज दिलेले रुग्ण 37 व मृत्यु 3


लातूर, (जिमाका):- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 23 मे 2020 रोजी लातूर जिल्ह्यातील एकुण 110 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी या संस्थेतील 34 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते व त्यातील 30 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून 4 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चारही रुग्ण काल पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या मुलीच्या कुटुंबातील आहेत व एम. आय. डी. सी. हडको येथील असून त्यांना कुठल्याही प्रकारचे लक्षणे नाहीत त्यांची सद्यस्थितीत प्रकृती ठीक आहे.


        उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 51 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी  44 व्यक्तींचे अहवाल   निगेटीव्ह आले असुन  5 व्यक्तींचे  अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 2  व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आहेत. पॉझिटिव आलेले चार रुग्ण कासराळ ता. उदगीर येथील असून हे सर्व चिमाजीवाडी येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले होते. तर एक पॉझिटिव्ह रुग्ण हा  उदगीर शहरातील असून  तो मुंबईतून प्रवास करून आलेला आहे.
       अहमदपूर  येथुन 11  व्यक्तींचे स्वॅब तपासीसाठी आले होते त्यापैकी 06  व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले असून 2 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत   व 3  व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आहेत. दोन पॉझिटिव व्यक्ती या मांडणी तालुका अहमदपूर येथील असून त्या दोन्ही व्यक्ती मुंबई येथून प्रवास करून आलेल्या आहेत असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय ढगे यांनी सांगितले.
निलंगा येथून 5 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  त्यापैकी  सर्वच 5 व्यक्तींचे अहवाल  निगेटीव्ह आले आहेत.  कासारशिरसी येथील 5 व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी आले होते त्यापैकी 5 ही व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. असे लातुर जिल्हयातील  एकुण 110 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 93 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 11 व्यक्तींचे अहवाल  पॉझिटिव्ह आले आहेत व 6 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत, अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली