कोणताही गरजवंत उपाशी राहता कामा नये  -नंदकुमार गादेवार

लातुर/ कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीत समाजातील कोणताही गरजवंत उपाशी राहता कामा नये व जीवनावश्यक वस्तूच्या  व्यवसायातील व्यापार्यांनी  काळजी घ्यावी असे आवाहन महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी लातुर जिल्हा आर्य वैश्य महासभेच्या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये मार्गदर्शन करताना केले लातुर जिल्ह्यात सर्व गावा गावात आर्य वैश्य समाजातील गरजवंत कुटूंबाला आवश्यक ती मदत आणि सहकार्य करण्यासाठी जिल्ह्या पदाधिकारी व सदस्यांनी कोणताही घटक उपाशी  राहता कामा नये असे आवाहन करून  राज्यातील सर्व समाज बांधवांना केंद्र शासनाच्या नवीन उद्योग योजने अंतर्गत समाजातील तरुणांना आत्मनिर्भर होण्यासाठी व सक्षम करण्यासाठी उपाय योजना कोणत्या कराव्यात याचा अभ्यास चालू असलयाची माहिती त्यांनी दिली या कॉन्फरन्स मध्ये राज्य कार्यकरिणी चे सचिव गोविंदराव बिडवई यांनी पण संघटनात्म बांधणी साठी वेळ काढून सदस्यांनी कार्य करावे असे म्हटले बांधकाम समिती चे अध्यक्ष भानुदासराव वट्टमवार यांनी  शासनाच्या सवलती मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मागणी करावी असे मत व्यक्त केले तर प्रदिप कोकडवार यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी सदस्य यांनी समाजातील शेवटच्या घटका पर्यंत संपर्क साधून कार्यरत राहवे असे म्हटले लातुर जिल्हाध्यक्ष सुरेशराव पेन्शलवार यांनी सर्वांचं स्वागत करून महासभेच्या माध्यमातून फुल नाही फुलांची पाकळी समजून सरकारी मदत निधीत सहकार्य करण्याचे आवाहन केले समाजातील सर्व क्षेत्रात  अनेक वेळा सहकार्य करणार व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित आहेत जीवनावश्यक क्षेत्रातील व्यापाऱ्यांना शासना कडून विमा संरक्षण मिळण्यासाठी   मागणी करून पाठपुरावा करू व सदर निवेदन लवकरच देण्यात येईल असे सचिव संतोष कोटलवार यांनी स्पस्ट केले या वेळी राज्य सदस्य शशिकांत कोटलवार यांनी शक्तिवर्धक आयुर्वेदिक व होमिओपॅथी औषधी समाज बांधवांना उपलब्ध करून देण्यासाठी सुचवले  या कॉन्फरन्स मध्ये लातुर उदगीर  जळकोट देवणी हाळी अहमदपूर सह सर्व प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते  आभार संतोष कोटलवार यांनी मानले अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख अविनाश बट्टेवार यांनी दिली आहे.