लातुरात विद्यार्थ्यां वसतिगृह व वासवी भवन उभारण्यासाठी महासभा सर्वोतोपरी मदत करणार
-नंदकुमार गादेवार
लातुर/प्रतिनिधी
लातुर येथे आर्य वैश्य समाजा च्या विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले विद्यार्थी वसतिगृह वासवी भवन उभारण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य महासभा निश्चित पणे करणार असे प्रतिपादन लातुर जिल्हा महासभा नूतन कार्यकारीणी निवड कार्यक्रमात आ भा आर्य वैश्य महासभा अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी केले
दरम्यान नूतन लातुर जिल्हा महासभेच्या अध्यक्षपदी सुरेश पेन्सलवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभाने सर्व जिल्ह्यातील समाज बांधवांची साखळी तयार करून समाज संघटन करण्याचे काम सुरू केले त्या अनुषंगाने येथील साळाई मंगल कार्यलया च्या व्यासपीठावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन नंदकुमार गादेवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते लातुर जिल्ह्यात सर्व गावा गावात व्यापारा च्या माध्यमातून आर्य वैश्य समाज वास्तव्य करतो समाजा च्या वाढत्या अडचणी दूर करण्यासाठी समाजा चे संघटन जरुरी आहे असे विचार आरक्षण समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रदिप कोकडवार यांनी मांडले तर समाजा च्या शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी महासभा कार्य करीत आहे तन मन धनाने सहकार्य करून समाज कार्य उभारावे असं मत जेष्ठ समाजभूषण भानुदासराव वट्टमवार पुणे यांनी व्यक्त केले सचिव गोविंद बिडवई यांनी समाज कार्यकर्ते व महासभा असे थ्री टायर पद्धतीने महासभा काम करणार असे स्पष्ट केले अध्यक्षीय समारोप प्रसंगी गादेवार म्हणाले की आर्य वैश्य समाजात हक्काची जागा आहे पण वासवी भवन नाही राज्यातील विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले वसतिगृह नाही ते उभारण्यासाठी सर्व मदत करू असा विश्वास देत समाजा चे संघटन ही काळाची गरज असल्याचे अनेक उदाहरण देऊन महत्व पटवून दिले या वेळी जिल्ह्यातील समाज बांधवांच्या उपस्थितीत लातुर जिल्हा आर्य वैश्य महासभा नूतन संपूर्ण कार्यकारीणी जाहीर करण्यार आली ती या प्रमाणे अध्यक्ष श्री सुरेशराव पेन्सलवार लातुर सचिव श्री संतोष कोटलवार अहमदपूर कोषाध्यक्षश्री शाम मलगे उदगीर सह सचिव श्री गणेशमहाजनहळीहंडरगुळी सह कोषाध्यक्ष श्री अविनाश बट्टेवार उपाध्यक्ष श्री विजय भिमाशंकर पारसेवार उदगीर श्री संदीप दिलीप मोदी देवणी श्री प्रशांत यरमलवार शिरूर अनंतपाळ श्री वीरभद्र कोटगीरे जळकोट श्री मनोज देवशेटवार चाकूर सर्व जिल्हा कार्यकारीणी सदस्य लातुरश्री विलास जिल्हेवार श्री अतुल कोटलवार श्री राजेश मद्रेवार श्री सुहास बोळसकर श्री शेखर मुक्कावार श्री गजानन पारसेवारअहमदपूर श्री संतोष कोटगीरे हडोळती श्री ज्ञानेश्वर कोटगीरे शिरूर ताजबंद डॉ गजानन दमकोडवार चाकूर श्री ज्ञानेश्वर बेजगमवार वाढवना गुडसुर नळगीर श्री अनंत पारसेवार उदगीर श्री गणेश विठ्ठलराव मुक्कावार धनंजय दत्तात्रय बच्चेवार श्री ज्ञानेश्वर नागनाथ पारसेवार वलांडी श्री संजय गोविंदराव हुडगे जळकोट श्री कृष्णा गंगाधर गबाळेचापोली श्री निलेश मद्रेवार सरपंच वरील सर्व मान्यवरांची निवड करण्यात आली प्रथम वासवी माते च्या प्रतिमेचे पूजन करून सुरवात करण्यात आली तर व्यासपीठावर महासभेचे कोषाध्यक्ष सुभाष कन्नावार अनिल मानाठकर प्रल्हाद देगावकर दीपक कोटलवार गजानन डुबे, अभय कोकड,दतात्रय दमकोंडवार गजानन चिद्रवार शशिकांत कोटलवार माणिक बट्टेवार रमाकांत रायवार आदीची उपस्थिती होती सुत्रसंचलन कोटगीरे सर व सुहास बोळसकर यांनी केले आभार राजूरवार यांनी मानले