श्री लक्ष्मी-गणेश यज्ञाची उत्साहात सांगता
 श्री लक्ष्मी-गणेश यज्ञाची उत्साहात सांगता 

लातूर : प्रतिनिधी 

श्रीमंत आर्य वैश्य समाज कुलगुरु भास्कराचार्य संस्थाच्या वतीने तेलंगाना राज्यातील निर्मल जिल्ह्यातील श्रीक्षेत्र बासर येथे दि़ ७ ते ९ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या श्री लक्ष्मी-गणेश यज्ञाचा (१०१ कुंड) उत्साहात समारोप झाला़ 

कुलगुरु भास्कराचार्य भगवान महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा यज्ञ झाला़ धावपळीच्या जीवनात समाजामध्ये प्रचंड ताणतणाव असून भौतिक व कृत्रिम सुखासाठी मानवाने मानसिक समाधान हरवून जीवन प्रचंड तणावग्रस्त करुन टाकले आहे़ या सर्व तणावांतून मुक्त होण्यासाठी ऋषिमुनींनी यज्ञ हा एकमेव उपाय सांगीतला आहे़ यज्ञामुळे समाज आरोग्य, बंधुत्ववृद्धी होऊन जीवन सुखकर होते़ त्या अनुषंगाने हे यज्ञ आयोजित करण्यात आले होते़ ४०४ यजमानांच्या या यज्ञात १०१ यज्ञ झाले़ त्यात लातूर, नांदेड, बीड, परभणी, जालना, हिंगोलीसह संपूर्ण महाराष्ट्रातील आर्य वैश्य समाजबांधव सहभागी झाले होते़ 

सदर श्री लक्ष्मी-गणेश यज्ञाच्या यशस्वीतेसाठी एकनाथ मामडे, विकासराव दुबे, दिगंबर लाभशेटवार, भानुदास वट्टमवार, जी़ एल़ निलावार, माणिक शेटे, औदुंबर बट्टेवार-पाटील, शशिकांत कोटलवार, विलास जिल्हावार अशोक गादेवार, रविंद्र बेजगमवार व कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांनी, संयोजन समितीने सहकार्य केले़