बेरोजगारांसाठी लातूर येथे 16फेब्रुवारी 2020 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

 


                                           
बेरोजगारांसाठी लातूर येथे 16फेब्रुवारी 2020
रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन
नामांकित कंपन्यांचे अधिकारी मुलाखती घेण्यांसाठी येणार 
            लातूर,-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योगजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, लातूर तथा शासकीय तंत्र प्रशाला केंद्र लातूर व सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने खाजगी क्षेत्रातील उद्योजक/कंपनी यांचेकडील विविध पदे भरण्यासाठी दि. 16 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 10.30 वाजता शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, क्रिडा संकूल औसा रोड, लातूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
            या रोजगार मेळाव्यात 1. धूत ट्रान्समिशन प्रा. लि. चाकण /पुणे, 2. बी. व्ही. जी. इंडिया लि. चाकण, रांजणगांव एमआयडीसी, पुणे 3. युरेका फोर्ब्स लि. पुणे 4. डेक्कन मॅनेजमेंट कन्सल्टन्ट पुणे/ औरंगाबाद, 5. सुर्योदय स्मॅाल फायनान्स बँक लि.पुणे /मुंबई, ICIC Bank लातूर 7. युनायटेड सेक्युरीटी फोरम, उदगीर /लातूर व इतर उद्योजकांकडून सेल्समन/ मार्केटींग मॅनेजर/टेलर Custmor Relationship Officer/ICICI Bank Sales Officer इत्यादी एकूण-105 पदांकरिता दहावी/ बारावी/ पदवीधारक पात्र व इच्छुक उमदेवारांच्या मुलाखती घेऊन निवड केली जाणार आहे. वेतन व इतर सोई/ सुविधा या बाबत संबंधित कंपनीच्या नियमानुसार प्रत्यक्ष मुलाखतीचे वेळी कंपनीचे अधिकारी माहिती देतील.
          या मेळाव्यास लातूर जिल्हयातील पात्र व इच्छुक असलेल्या स्त्री /पुरुष उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र/ कागदपत्रांच्या 2-प्रति सांक्षाकित करुन सोबत  आणाव्यात  व स्वत:चा  बायोडाटा, 02 पासपोर्ट  आकाराचे  फोटो रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gpv.com या संकेतस्थळावर ऑनलाईन नांव नोंदणी प्रमाणपत्र, इत्यादी सह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी स्वखर्चाने रोजगार मेळाव्याचे ठिकाणी हजर राहुन सदर रोजगाराच्या संधीचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त  बेरोजगार उमेदवारांनी सहभाग घ्यावा. अधिक माहितीसाठी किंवा आपणास येणाऱ्या तांत्रिक अडचणी करिता या कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02382-245183 वर संपर्क करावा असे, आवाहन सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे रा.नि. वाकुडे लातूर यांनी केले आहे.